#Accident

हरणाच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी……! 

12 / 100
केज दि.१६ – (विनोद ढोबळे) तालुक्यातील विडा येथील आठवडी बाजार उरकून गावाकडे परतत असताना हरणाच्या कळपाला मोटारसायकल ची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
                सदाशिव नामदेव आंधळे रा. नामेवाडी असे जखमीचे नाव आहे. आंधळे हे एम,एच 20 डीपी 7783 या मोटर सायकल वरून गावाकडे परतत असताना गावाच्या शेजारी असलेल्या शौर्य हॉटेल समोरून हरणाचा कळप रस्ता ओलांडत होता. यावेळी मोटारसायकल ची धडक हरणाला बसली व यात आंधळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागच्या पंधरा दिवसातील त्याठिकाणी झालेला हा तिसरा अपघात  आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close