#Social
केज येथील चिंचपूर मारुती मंदिर येथे भव्य श्वान प्रदर्शन…..!
केज दि.१८ – शहरालगत असलेल्या चिंचपूर मारुती येथे माधवबाग प्रतिष्ठान आयोजित हनुमान जयंती निमित्त देशी-विदेशी श्वानप्रदर्शन शिबिर रोजी घेण्यात आले.खा. रजनीताई पाटील,माजी मंत्री अशोकराव पाटील,आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
संपन्न झालेल्या प्रदर्शनाचे उदघाटन सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हारूनभाई इनामदार हे तर प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांची होती.
केज धारूर, भूम, बार्शी,कळंब परंडा,वडवणी,परंडा माजलगाव यांसह विविध शहरातून देशी विदेशी एकूण १६० श्वान सहभागी झाले होते.पुढील वर्षीच्या भव्य प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सुरेश पाटील यांनी केले. पशुपक्षी वृक्षांवर प्रेम करणारे सुरेश पाटील हे नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम ठेवून केजच्या नागरिकांना संधी देत असतात असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
प्रदर्शनात
यामध्ये प्रथम क्रमांक पिटबुल जातीचा श्वान शहनवाज मौलासाहेब सौदागर यांचा आला.यश काळे यांचा श्वान द्वितीय क्रमांक, दिक्खत जागर धारूर द्वितीय,रोहन हक्कदारी ग्रेडटेन द्वितीय क्रमांक,अमीर पठाण लॅब तृतीय
सोनू अंधारे डॉबरमन आदींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रदर्शनात
यावेळी डॉ. महेश लकडे, डॉ. विठ्ठल मुंडे, डॉ. श्रीनिवास पाथरकर, डॉ. सुदर्शन मुंडे, डॉ. श्रीकृष्ण थळकरी, डॉ. बाळासाहेब गायकवाड, डॉ. अभिषेक रंधवे ,डॉ. प्राजक्ता भोळे, डॉ. दीक्षांत जोगदंड, श्री. सत्वधर, गिरी, कुलकर्णी श्रीमती तांदळे, घुमलवाड आदी पशुसंवर्धन विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.