बँकांच्या वेळेत बदल, ग्राहकांना मिळणार अतिरिक्त वेळ…..!
बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयने ग्राहकांसाठी ही खास सुविधा आणली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 18 एप्रिलपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत मोठा बदल केला आहे. आता बँक उघडण्याची वेळ 10 वाजता बदलून 9 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
कोरोनामुळे बँकांच्या वेळेत एका तासाची वेळ कमी करण्यात आली होती. पण, आता परिस्थिती सुधारत असल्याने आरबीआयने पुन्हा बँकांची वेळ वाढवली आहे. यामुळे बँकिंग व्यवहार करण्यासाठी अधिकचा एक तास ग्राहकांना मिळणार आहे. मात्र, बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार बँकांच्या कामकाजात आणखी एक तासाची भर पडली आहे. RBI 18 एप्रिल 2022 पासून म्हणजेच आजपासून ही सुविधा लागू करत आहे. RBI चा हा नवा नियम स्टेट बँक ऑफ इंडियासह 7 सरकारी आणि 20 खाजगी बँकांना लागू होणार आहे. आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बाजार देखील आजपासून 10 ऐवजी सकाळी 9 वाजता उघडणार आहेत.
दरम्यान, आरबीआय एटीएम व्यवहारांच्या सोयीसाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा लवकरच ग्राहकांना मिळणार आहे. एटीएमद्वारे कार्डलेस व्यवहाराचा लाभ मिळणार आहे. युपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना एटीएम मशीनमधूनही पैसे काढता येणार आहेत.