#Accident

केज कळंब रोडवरील पुलावर अपघात, पती-पत्नी जखमी…..!

10 / 100
केज दि.१९ – केज कळंब रोडवर बुध्दसृष्टी जवळ असलेल्या पुलावर मोटार सायकल अपघातात पती-पत्नी जखमी झाले आहेत.
              दि. १८ एप्रिल सोमवार रोजी केज-कळंब महामार्गावर बुध्दसृष्टी जवळच्या पुलावर काशिनाथ महादेव राऊत वय (४८ वर्ष) व त्यांची पत्नी (४० वर्ष) रा. साळेगाव ता.केज हे मोटार सायकल क्र (एम एच ४४/डब्ल्यू- ०१७१) साळेगावकडे येत असताना रात्री ९ वा. दरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघातात काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. पतीपत्नीवर उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे प्रथमोपचार करण्यात आले. काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविले आहे.
                दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पुलावर मागच्या अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून वाहतूक एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या सूचनेवरून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close