क्राइम

अंदर बाहर जुगार खेळणारे चौघे ”अंदर” तर दहाजण गेले पळून…..!

6 / 100
बीड दि.२२ – एका झाडाखाली बसून झंना मन्ना नावाचा अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या चौघांना एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने तालुक्यातील लिंबागणेश येथून अंदर केले तर दहा जणांनी पळ काढला असून एकूण चौदाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               दि. 21/04/2022 रोजी सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली की,  लिंबागणेश येथे शिवाजी शिंदे  व मधुकर बांगर हे आपले स्वतःच्या फायद्या करिता विनापरवाना बेकायदेशीररित्या काही इसमांना गोवर्धन वाणी यांचे शेतात मक्याच्या शेती जवळील लिंबाचे  झाडाखाली गोलाकार एकत्र बसून पैशावर झना  मन्ना नावाचा अंदर बहार जुगार खेळत  खेळवत आहेत.सदरील माहिती त्यांच्या पथकातील जमादार यांना देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सायंकाळी 5 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी झना मन्ना जुगार खेळणारे 4 इसम जागीच मिळून आले व इतर 10  जण पळून गेले. यावेळी सदरील इसमांच्या ताब्यात झना मन्ना जुगाराचे साहित्य व नगदी 45 220 रुपये व चार मोटारसायकली 2 50 000 हजार रुपये असा एकूण 295 220 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
         दरम्यान एकूण 14 आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे नेकनुर येथे बालाजी दराडे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई  सहाय्यक पोलिस अधिक्षक  पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भांडणे संजय टूले यांनी केली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close