केज तालुक्यातील मानेवाडी येथील दैवशाला गंगाराम माने ( वय २७ ) या विवाहित महिलेचे १२ एप्रिल रोजी राहत्या घरी असताना डोके दुखू लागल्याने त्या घाईगडबडीत या महिलेने डोकेदुखीचे औषध समजून तणनाशकाचे ( विषारी औषध ) सेवन केले. त्यात ती चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर १४ एप्रिल रोजी दैवशाला माने या महिलेचा मृत्यू झाला. अशी खबर २२ एप्रिल रोजी तिचे वडील मारुती डिगांबर धायगुडे ( रा. मानेवाडी ) यांनी दिल्यावरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस नाईक शामराव खनपटे हे पुढील तपास करत आहेत.