क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई, गुन्हेगारांचे धाबे दणाणले…..!
बीड दि.२७ – एएसपी पंकज कुमावत हे जिल्ह्यात रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांवर चाप बसला आहे तर कित्येक गुन्हेगार सैरावैरा झाले आहेत.आणि त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारीही एक मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, दिनांक 26 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी बातमी मिळाली की, दि.26 ला रात्री ट्रक क्रमांक KA 56 5413 मध्ये संगारेड्डी राज्य कर्नाटक येथून गोवा गुटखा भरून तो ट्रक माजलगाव मार्गे जालना येथे चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. सदर माहिती मिळाल्यावर पथकातील पोलिस अंमलदार व पोलिस ठाणे माजलगाव ग्रामीण येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक श्रीमती रस्मिता राव यांना कळवून सदर वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पंकज कुमावत यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती रस्मिता राव व पथकातील पोलिस कर्मचारी हे दिनांक 27 रोजी 2 वाजता पात्रुड येथे थांबले असता तेलगाव कडून माजलगाव कडे ट्रक क्रमांक KA 56 5413 हा जाताना दिसल्याने त्यास थांबवले. ट्रक चालकास ताब्यात घेऊन ट्रकची पाहणी केली असता आत मध्ये गोवा गुटख्याचे मोठे 31 भोत (किंमत 33 24750 रु) व ट्रक किंमत 600000 रु व 1 मोबाईल किंमत 15000 असा एकूण 39 39 750 रुपये चा माल मिळून आला.
दरम्यान, ट्रक चालक व गुटखा मालक यांच्याविरुद्ध बालाजी दराडे यांचे फिर्यादी वरून पोलीस ठाणे माजलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती रस्मिता राव व पथकातील बालाजी दराडे, राजू वंजारे, सचिन अहंकारे, धोंडीराम मोरे, अतिशकुमार देशमुख, युवराज चव्हाण यांनी केली.