#Social

बेरोजगारांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा…..!

9 / 100

मुंबई दि.२९ – देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून राजकारण तापलेलं असताना आता ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेत असल्याचं घोषित केलं आहे.

          राज्यात शैक्षणिक पात्रतेप्रमाणं सेवायोजन कार्यालयाकडं तब्बल 45 लाख बेरोजगार युवक-युवतींची नोंद आहे. तर नोंद नसलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. शैक्षणिक पात्रता असून देखील नोकरी मिळत नसलेल्यांसाठी सरकारनं बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

नोकरी लागेपर्यंत 5 हजार रूपये भत्ता मिळणार आहे. रोजगार हवी असलेली व्यक्ती पात्र आहे. बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी काही अटी आणि शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकार बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करणार आहे.

बेरोजगार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा अधिक नसावे. अर्जदाराने राज्याच्या सेवायोजन केंद्रात नाव नोंदविणे आवश्यक, अशी नाव नोंदणी झालेल्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत तिला नोकरी मिळालेली नाही अशी व्यक्ती. किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी/उच्च माध्यमिक/पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर इतकी असावी. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

दरम्यान, शासनाकडून लवकरच बेरोजगार भत्त्याबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या नियमावलीनूसार बेरोजगार भत्ता योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close