सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस नाईक लाच घेताना पकडले……!
अंबाजोगाई-येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस नाईकला १५ हजारांच्या लाच प्रकरणी आज (दि.२९) सायंकाळी ६ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.२९) पकडले आहे.या कारवाईमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली.
तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहा.पोलीस उपनिरीक्षक प्रमोद प्रताप सेंगर(ठाकूर) (वय-५१) व पोलीस नाईक नितीन चंद्रकांत चौरे (वय-३३) यांनी केली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर आज (दि.२९) पकडण्यात आले आहे.दरम्यान या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.