#निधन वार्ता
शाळकरी मुलीची आत्महत्या,कारण अस्पष्ट……!
केज दि.3 – तालुक्यातील जिवाचीवाडी येथे एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
दि. ३ मे रोजी दुपारी १ च्या दरम्यान केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे कु. प्रणिता निळकंठ चौरे वय (१६ वर्ष) या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, माहिती मिळताच केज पोलीस ठाण्यातील विडा बिटचे पोलीस नाईक उमेश आघाव आणि बाळराजे सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कार्यवाही केली. प्रणिता चौरे हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.