व्हायरल

कॉल रेकॉर्डिंग नियमात मोठा बदल, आजपासून करता येणार नाही कॉल रेकॉर्डिंग….. मात्र…..!

9 / 100

मुंबई दि.११ – Google Play Store Policy मध्ये बदल झाल्यामुळे कॉल रेकॉर्डिंग App उद्यापासून काम करणार नाहीत Truecaller सह इतर App चे वापरकर्ते त्यांच्या Android फोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत.

                     Google ची Play Store नियमावली आजपासून म्हणजेच 11 मे पासून बदलणार आहे. यामध्ये एक बदल म्हणजे अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग App बंद करणे. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग Appसह Android स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. गुगलने म्हटले की, सुरक्षेमुळे कॉल रेकॉर्डिंग App बंद करण्यात येत आहेत. कॉल रेकॉर्डिंग App अनेक परवानग्या घेतात ज्याचा अनेक विकासक चुकीचा फायदा घेतात. याशिवाय कॉल रेकॉर्डिंग App बाबतचा कायदाही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा आहे. त्यामुळे कंपनी त्यात बदलही करत आहे. गुगलच्या नवीन नियमावलीमुळे आजपासून कॉल रेकॉर्डिंग App पूर्णपणे बंद होतील.

परंतु, ज्या फोन्सना आधीच कॉल रेकॉर्डिंग फंक्शनॅलिटी देण्यात आली आहे ते काम करत राहतील. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ते पूर्वीप्रमाणेच काम करत राहतील. या नियमावलीमुळे ज्यांच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App नाही आणि ते इतर थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग Appद्वारे कॉल रेकॉर्ड करतात त्यांना यापुढे कॉल रेकॉर्ड करता येणार नाही.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close