महाराष्ट्र

शेतक-यांच्या मागण्या जलद गतीने सोडवा – आ. वरपुडकर

शालेय शिक्षणमंत्री यांच्याशीही साधला संवाद

पाथरी दि.२१ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती मध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्रिमंडळ सदस्यांची व आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक संपन्न झाली.यात जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रश्न त्वरीत निकाली काढा अशी मागणी आ सुरेशराव वरपुडकर यांनी केली.

आ.सुरेशराव वरपुडकर यांनी जिल्ह्यातील जनतेला व विशेषतः शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी संदर्भात मागण्या करून त्या जलद सोडवण्या साठी विनंती केली. यावेळी परभणी जिल्ह्यात युरिया, डि.ए.पी. व इतर खतांची तीव्र टंचाई झाल्या मुळे शेतकऱ्यांना तात्काळ खत उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी बैठकीस उपस्थित असलेले ना.विश्वजित कदम यांच्या कडे केली. उपस्थित मंत्रीमहोदयां कडे पाथरी, सोनपेठ, मानवत व परभणी या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे अनुदान मिळाले नाही त्यांना अनुदान देण्याची व शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस खरेदी करण्याची मागणी केली.

तर शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधताना जि.प. व इतर अनुदानित शाळेतही CBSE व ICSE प्रमाणे अभ्यासक्रम चालू करण्यात यावा असे मत व्यक्त केले.तसेच सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारी काही प्रमाणात आहेत त्यावरही राज्यसरकारने उपाययोजना करावी अश्या विविध मागण्या आ.सुरेशराव वरपुडकर यांनी बैठकीत मांडल्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close