सातेफळ येथील गोकुळ फुलचंद भांगे ( वय २० ) या तरुणाने ११ मे रोजी सकाळी आठ वाजेपुर्वी विषारी औषध प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. १३ मे रोजी केज ठाण्याचे पोलीस नाईक मंगेश भोले यांनी दिलेल्या खबरेवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे करताहेत.