कुंबेफळ बसस्थानक नजीक असलेल्या गणपती मंदिराच्या परिसरात राज्य रस्त्यावर दोन दुचाकी धडकल्या असून बालासाहेब वसंत काकडे रा. बनसारोळा ता.केज, कृष्णा जोगदंड रा.कळंब, बप्पा रामलिंग स्वामी रा. पिंपळगाव ता. केज हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात रविवारी (दि.१५) रोजी दुपारी झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच 108 चे चालक अर्जुन बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले. परंतु गंभीर जखमा असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.