आरोग्य व शिक्षण

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा १२ वा दिवस

अद्याप तोडगा नाही

केज दि.२२ – मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करत आहेत. मात्र अद्यापही सदरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्व कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा १२ वा दिवस उजाडूनही अद्याप तोडगा निघालेला नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात हजारो आरोग्य कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे २०१० पासून सदरील कर्मचारी नियमित सेवेत समायोजन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलने करूनही सदरील मागणीची दखल घेतलेली नाही. दरम्यान संबंधित प्रश्नी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली. तर एका समितीने २०१९ मध्ये समायोजन करण्याच्या बाजूने अहवाल देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हजारो कर्मचारी आपल्या हक्कापासून वंचित आहेत.

दरम्यान कोरोना काळातही सदरील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. केज येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या समोर तालुक्यातील मागच्या बारा दिवसांपासून  एस.बी. थळकरी, यु.एस.जायभाय, आय.आय.शेख, ए. पी.शिंदे, के.एस. डिसले, एस.एस. थोरात, एस.पी.सपकाळ, के.बी.तुपारे, एस.एम.मस्के, ए. व्ही. ससाणे, सोमेश स्वामी, डी. पी. सपकाळ इत्यादी कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारून धरणे आंदोलन करत आहेत. मात्र संबंधित आंदोलकांकडे कुणीही लक्ष दिले नसून कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

नियमित सेवेत सामावून घेऊन सर्व लाभ देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर सदरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने ऐन कोरोनाच्या संकटात नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. दरम्यान वरिष्ठ पातळीवर आंदोलना दरम्यान बैठका झाल्या आहेत. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नसून आणखी किती दिवस बैठका सुरू राहणार आहेत हा प्रश्न आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close