क्राइम

पतीला लोखंडी गजाने मारहाण करीत महिलेचा विनयभंग….! 

6 / 100
केज दि.१७ – शेतात नांगरण्याचा तुमचा काय संबंध ? असे म्हणत एका शेतकऱ्यास त्याचा भाऊ व पुतण्याने लोखंडी गज व कत्तीच्या मुठीने मारहाण करीत जखमी केले. तर महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
      युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एक शेतकरी व त्याची पत्नी हे दोघे १६ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करीत होते. यावेळी शेतात नांगरण्याचा तुमचा काय संबंध असे म्हणत त्याचा भाऊ श्रीमंत सपकाळ, पुतण्या विशाल सपकाळ या दोघांनी लोखंडी गज व कत्तीच्या मुठीने मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर या शेतकऱ्याच्या पत्नीचा वाईट हेतूने हात धरत अंगावरील कपडे फाडत विनयभंग केला. शालूबाई सपकाळ, सुप्रिया सपकाळ या दोघींनी लाथाबुक्याने मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद ३२ वर्षीय पीडित महिलेने दिल्यावरून श्रीमंत सपकाळ, विशाल सपकाळ, शालूबाई सपकाळ, सुप्रिया सपकाळ या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार सीताराम डोंगरे हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close