#Accident

कुंबेफळजवळ कंटनेरची ट्रान्सफार्मरला धडक……! 

6 / 100
केज दि.१८ – केजकडून अंबाजोगाईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या रोहित्रला कंटनेरची जोराची धडक बसली. या अपघातात चालक आणि क्लिनर दोघे जखमी झाले असून रोहित्र सेट पूर्ण निकामी होऊन पोल ही वाकडे झाल्याने महावितरणचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. हा अपघात कुंबेफळ ( ता. केज ) येथे बुधवारी ( दि. १८ ) दुपारी २ वाजता झाला.
      केजकडून कंटनेर ( टी. एस. १२ यु डी १२९३ ) अंबाजोगाईकडे बुधवारी दुपारी निघाला होता. केज – अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळहुन पुढे गेल्यानंतर कंटनेरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटनेर हा कुंबेफळ शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतभाई ट्रान्सफार्मरला जाऊन धडकला. या अपघातात कंटनेरचा चालक व क्लिनर दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ट्रान्सफार्मरला जोराची धडक बसल्याने ट्रान्सफार्मरचे तुकडे – तुकडे होऊन लोखंडी पोल ही मोडले आहेत. यामध्ये विद्युत महावितरण कंपनीचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू असल्याने जीवित हानी झाली नाही. महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ अशोक विष्णू वैरागे ( रा. आनंदगाव ता. केज ) यांच्या फिर्यादीवरून कंटनेर चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.
        दरम्यान, केजहून पुढे गेल्यानंतर कंटनेर चालकाने क्लिनरला वाहन चालविण्यास दिल्याने हा अपघात झाला असावा अशी चर्चा घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांमध्ये होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close