आपला जिल्हा

अखिल भारतीय मराठी पञकार परिषद शाखा अंबाजोगाई च्या वतीने मान्यवरांचे होणार सत्कार….. !

6 / 100 SEO Score
 अंबाजोगाई दि.२४ – दर्पण दिन व मुकनायक दिनानिमित्त मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी अखिल भारतीय मराठी पञकार परिषद व डिजीटल परिषदच्या वतीने पञकारिता ,सामाजिक व इतर क्षेञात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाकार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, तालुकाध्यक्ष बालाजी खैरमोडे,डिजीटल परिषद चे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी केले आहे.
              सामाजिक,राजकीय व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 ठिक सकाळी 11 वाजता,बाळशास्ञी जांभेकर, पञकार कक्ष.न.प अंबाजोगाई येथे होणार आहे.
डिजीटल क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार-दिनकर शिंदे (नंदकुमार पांचाळ ,डिजीटल मिडीया), ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी (कै.व्यंकटेश मुडेगावकर प्रिंट मिडीया),प्रियदर्शी पतसंस्था अंबाजोगाई चेअरमन सचिन बनसोडे यांच्यावतीने साम टीव्ही पत्रकार योगेश काशीद ,मुंबई यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,कै. शारदाबाई बब्रुवान जगताप यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- (अशोक खुळे दैनिक सकाळ टाकरवन तालुका माजलगाव ) ,कै. शिवाजीराव पुंडलिकराव मामडगे यांच्या स्मरणार्थ जलसंवर्धन ( पाणी माती या विषयावर उत्कृष्ट कार्य )आणि सामाजिक उत्कृष्ट कार्य (राजेंद्र मुरलीधर जाधव श्रीपतरायवाडी तालुका अंबाजोगाई) , 2022 ते 2026 पर्यंत 3 वर्षात सातेफळ गावातील सिमेंट रस्ते,पिण्याचे पाणी,बोअरवेल,स्वच्छता,शालेय विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरिकसह नागरी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे
सातेफळ येथील सरपंच हाजी चुन्नुलाल शेख यांना आदर्श सरपंच पुरस्कार, मानव लोक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे शाम सरवदे यांना सामाजिक पुरस्कार, निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे पशुपक्षी,प्राणी यांना दयाभाव दाखवून त्यांच्या सोबत सलोखा जपणारे निसर्ग प्रेमी पोलीस कर्मचारी बालासाहेब पोटभरे यांना पर्यावरण पुरस्कार, दुर्लक्षित वयोवृद्ध निस्वार्थ पणे नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणारे अंबाजोगाई तहसील कार्यालयातील प्रमोद चौधरी व उमा गोस्वामी यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार,अंबाजोगाई शहरातील नागरी समस्या व स्वच्छतेचा प्रश्न प्रकर्षाने सोडवण्यात सदैव तत्पर असणारे न.प.स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे,तर ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणारे सत्कार मूर्ती सुनिल शाहूराव देशमुख (बोरीसावरगाव),सुरेश बब्रूवान जगताप(मा.सरपंच,धानोरा खुर्द),वृक्षमिञ सुधाकर देशमुख यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
                 सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एम.देशमुख (मुख्य विश्वस्त अखिल भारतीय मराठी पञकार परिषद ),तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी पञकार परिषदेचे विभागीय सचिव रवि उबाळे,डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे,बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके तर प्रमुख अतिथी म्हणून आ.नमिताताई मुंदडा (केज मतदारसंघ),नंदकिशोर मुंदडा (नगराध्यक्ष,न.प. अंबाजोगाई),दिनेश भराडिया (उपनगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई),पृथ्वीराज साठे(माजी आमदार, केज मतदारसंघ), सौ.संगिताताई ठोंबरे (माजी आमदार, केज मतदारसंघ), रमेश आडसकर (चेअरमन, अंबा कारखाना),राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प.गट), राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई), डाॅ.शंकर धपाटे (अधिष्ठाता एस.आर.टी.ग्रामीण रुग्णालय,अंबाजोगाई) प्रियंका टोंगे (मुख्याधिकारी,न.प.अंबाजोगाई),शरद जोगदंड (पोलीस निरीक्षक शहर, अंबाजोगाई), मुरलीधर खोकले (पोलीस निरीक्षक ग्रामीण, अंबाजोगाई ), ॲड.अजित लोमटे (अध्यक्ष, वकिल संघ अंबाजोगाई),डाॅ.राजेश इंगोले (राज्य वैद्यकीय सल्लागार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद),डाॅ.राहूल धाकडे (वैद्यकीय अंबाजोगाई तालुका सल्लागार अखिल भारतीय मराठी पञकार परिषद )हे उपस्थित राहणार असून या सत्कार समारंभात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हाकार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बालाजी खैरमोडे, डिजीटल मिडायाचे अध्यक्ष अभिजीत लोमटे, कार्याध्यक्ष सतिश मोरे,उपाध्यक्ष संजय जोगदंड, प्रिंट मिडीयाचे अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष सालेम पठाण, सचिव मारोती जोगदंड, कोषाध्यक्ष अभय जोशी,कृती हल्ला समितीचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत उदारे ,बीड जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर, तालुका संघटक ताहेर पटेल,प्रशांत लाटकर, अशोक कोळी,सिद्दिकी आरेफ, शेख फेरोज, स.का पाटेकर, अनिरुद्ध पांचाळ, विश्वनाथ कांबळे,बालासाहेब ढगे,गोविंद सुर्यवंशी,शेख अहमद,दत्ता खोगरे,योगेश डाके,सचिन मोरे,अमोल माने आदींनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close