तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही १८ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घरासमोर बसली असता धनराज नेहरकर हा तिच्या चारित्र्याबद्दल अश्लील भाषेत बोलू लागला. त्यामुळे मुलगी तेथून उठून चालल्याने त्याने तिच्या केसाला धरून रस्त्यावर पाडत विनयभंग केला. त्याला ढकलत पीडिता घराकडे निघाली असता त्याने शिवीगाळ करत तुझ्यावर अत्याचार करून जीवे मारतो अशी धमकी दिली. तसेच तुझा बाप सुटला तर त्याला पण मारून टाकतो अशी धमकी दिली.
अशी फिर्याद पीडित मुलीने दिल्यावरून धनराज नेहरकर याच्याविरुद्ध केज पोलिसात पोक्सो सह, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करत आहेत.