क्राइम
केजच्या धारूर चौकात एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई……!
केज दि.२४ – बेकायदेशीरित्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने एका टेम्पोत भरून जनावरे घेऊन जाताना एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने केजच्या धारूर चौकात मोठी कारवाई केली असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 23/05/2022 रोजी सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी बातमी मिळाली की जामखेड येथून आयशर टेम्पो क्रमांक MH 14 BJ 2800 यामध्ये बेकायदेशीररित्या 12 बैल व एक गाई भरून त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्यासाठी रात्री केज मार्गे हैदराबाद येथे घेऊन जात आहे.सदर माहिती पथकातील पोलीस अंमलदार यांना दिल्याने पोलीस आमलदार यांनी सदर चा आयशर टेम्पो क्रमांक MH 14 BJ 28 00 आज दिनांक 24 /5/ 2022 रोजी मध्यरात्री धारूर चौक केज थांबून चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाकिर अजिज कुरेशी रा. चौसाळा व त्याचे दोन साथीदार यांना ताब्यात घेतले.अधिक विचारपूस करून कागदपत्र विचारले असता व जनावरे वाहतूक करण्याचा परवाना विचारले असता कोणताही परवाना जवळ नसल्याचे सांगितले. सदरची जनावरे जामखेड येथील व्यापारी साजिद कुरेशी यांच्या असून त्यांच्या सांगण्यावरून जामखेड येथून भरून हैदराबाद येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे केज येथें घेऊन येऊन सदर टेम्पो तील जनावरे खाली उतरून मोजली असता अकरा बैल व एक गाय असा एकूण 320 000 रुपयांचे व टेम्पो किंमत 600000 रुपये असा एकूण 920000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त केला.
दरम्यान, चार आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे केज येथे बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पंकज देशमुख (पोलीस अधिक्षक बीड), सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत केज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भांडणे यांनी केली आहे.