#Accident
केजपासून पाच किमी अंतरावर अपघात, मोठी वाहतूक कोंडी…..!

केज दि.२६ – केज बीड रोडवरील कदम वाडी पाटीवर सोयाबीन भरलेल्या कंटेनर ला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने कंटेनर मुख्य रस्त्यावर आडवा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची रांग लागली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

गुरुवारी दि.२६ रोजी सकाळी 6 च्या दरम्यान सोयाबीन भरून लातूरकडे निघालेल्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली.धडक लागल्यानंतर कंटेनर मुख्य रस्त्यावरच आडवा झाल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नाही. छोटी वाहने कशीबशी मार्ग काढत आहेत परंतु मोठ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.