क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची आणखी एक कारवाई……!
बीड दि.२६ – मागच्या कांही महिन्यांपूर्वी केज उपविभागाला एएसपी पंकज कुमावत रुजू झाल्यापासून शेकडो अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त झाले आहेत तर कित्येक गुन्हेगार सुतासारखे सरळ झाले आहेत. अवैध गुटखा विक्री, पत्त्यांचे क्लब यासह चोरट्या वाहतुकीवर आळा बसला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाईतही मटका जुगारावर मोठी कारवाई करत सात जुगारी व दोन बुकीं चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 25/05/2022 रोजी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई बस स्टँड परिसरामध्ये अवैद्य मटका जुगारावर कारवाया करण्याचा आदेश मिळाला होता. त्यानुसार अंबाजोगाई शहर व परिसरात काही इसम कल्याण नावाचा मटका जुगार खेळत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाल्याने दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नमूद ठिकाणी अचानक छापा मारला. त्याठिकाणी चालता-फिरता कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना शेख जमीर शेख जमीर, दिगंबर जनार्धन तपकिरे, इरफान उस्मान खाँन, शेख मोहसीन युनूस, शेख वसीम शेख मन्नू, गोरख अरुण घाडगे, इनायत मुनीर पठाण सर्व रा. अंबाजोगाई व दोन बुकी मालक सय्यद अंवर सय्यद अजगर, इमाम चाँद इमाम गवळी रा. दोन्ही अंबाजोगाई हे दिसून आले. त्यांच्याकडून जागीच जागीच 82470 हजर रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन एकूण सात आरोपी व दोन बुकी मालक अशा एकूण नऊ आरोपी यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ )प्रमाणे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचे आदेशाने व सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग,पोना. दिलीप गीते, पोकॉ.संतोष गीते, शमीम पाशा, गोविंद मुंडे यांनी केली.