1 जूनपासून दुचाकी चारचाकी गाडी मालकांच्या खिशाला लागणार कात्री……!
वाहन मालकांसाठी एक महत्वाची माहीती समोर येत आहे. दुचाकी आणि चारचाकीसह सर्व गाड्यांचे थर्ड पार्टी मोटर (विमा) इन्शुरन्स प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाच्या माहितीनुसार वाहनांवरील इन्शुरन्स विमा 1 जूनपासून वाढ लागू होणार आहे. या निर्णयामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स महाग होणार आहे.
प्रथमच थर्ड पार्टी दर निश्चित केली आहे. मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रीमियमवर 7.5 टक्के सूट देण्यात आलीय.
तसेच, 30 किलोव्हॅटहून जादा इलेक्ट्रीक खासगी वाहनांवरील प्रीमियम 1,780 रुपये असतील. तसेच, 12 हजार ते 20 हजार किलो माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचे प्रीमियम 35,313 रुपये भरावे लागतील. तर 40 हजाराहून जादा किलो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रीमियम 44,242 रुपये भरावे लागतील. 30 किलोहून जादा व्हॅट प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2,904 रुपये द्यावे लागणार आहे. आता नवीन दर 1 जूनपासून लागू होतील.
या दरासंदर्भात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून सूचना जारी करण्यात आली आहे.