क्राइम
महामार्गावर लूटमार करणारे पाचजण केज पोलिसांच्या ताब्यात…..!
बीड दि.२८ – महामार्गावर जॅक ठेवून लोकांना प्रलोभणाला बळी पाडून तसेच लुटमार करुन दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून पाच आरोपींना केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 07/05/2022 रोजी पहाटे 04.00 वा चे सुमारास बीड कडुन अंबाजोगाईकडे जात असलेली कार मांजरसुभा ते अंबाजोगाई जाणारे महामार्गावर सारणी सांगवी पाटीजवळ रोडवर जॅक ठेवून कार चालकाने जॅक घेण्यासाठी कार थांबविले नंतर दबा धरुन बसलेले अनोळखी सहा ते सात अज्ञात आरोपीनी चालकाला व गाडीतील इतर लोकांना मारहाण करुन त्यांचेकडील रोख रक्कम व दागीने बळजबरीने लुटले होते त्यावरुन पोलीस स्टेशन केज गुरनं गुरनं 161/2022 कलम 395 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होता.त्यानंतर दिनांक 23/05/2022 रोजी रात्री 01.30 वा.चे सुमारास मांजरसुभा ते अंबाजोगाई जाणारे महामार्गावर मस्साजोग शिवारात रोडवर रोडवर जॅक ठेवून ट्रक चालकाने जॅक घेण्यासाठी ट्रक थांबविले नंतर दबा धरुन बसलेले अनोळखी अज्ञात आरोपीनी ट्रक चालकाला मारहाण करुन त्यांचेकडील रोख रक्कम व दोन मोबाईल बळजबरीने लुटले होते. त्यावरून पोलीस स्टेशन केज येथे गुरनं 188/2022 कलम 394,34 भादवि प्रमाणे दाखल होते.
सदर दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, बीड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, बीड हे समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला वरील गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यावरुन सदर संशयीत आरोपीना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी वरील दोन्ही गुन्हे त्यांचे वेगवेळ्या साथीदारसह केली असल्याची कबुली दिली असुन आरोपीकडुन गुन्हयात चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात सचिन शिवाजी काळे वय 24 वर्षे रा. पारा ता. वाशी, पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापु शिंदे वय 22 वर्षे रा. खोमनवाडी शिवार ता. केज, रामा लाला शिंदे वय 23 वर्ष रा. नांदुरघाट, दादा सरदार शिंदे वय 45 वर्ष रा. नांदुरघाट, विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार वय 22 वर्ष रा. चिंचोली माळी गायराण ता. केज यांना ताब्यात घेवून पो.स्टे. केज गुरन 61/2022 कलम 395 भादवि चे तपास कामी पो.स्टे. ला हजर केले आहेत.
सदर आरोपी हे रात्रीच्या वेळी एकत्रीत येवून महामार्गावार जॅक ठेवून जॅक घेण्याच्या अमिषाने वाहन चालकाने वाहन थांबवून चालक जॅक घेण्यासाठी गेल्यानंतर दबा धरुन बसलेले आरोपी वाहन चालकाला तसेच वाहनातील इतर लोकांना मारहान करुन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम मौल्यवान वस्तु व इतर साहित्य बळजबरीने लुटमार करायचे सदर आरोपींवर यापूर्वी चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे बीड तसेच उस्मानाबाद जिल्हयात दाखल आहेत.आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील गुन्हयातील चोरलेल्या मुद्येमाला बाबत व त्यांनी केलेल्या आणखीन गुन्हयाबाबत तपास चालू आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.