आपला जिल्हा

केज पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या…..!

9 / 100

केज दि.३० –  येथून इतरत्र बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला.

केज येथे दीर्घ सेवा बजावलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर (अंबाजोगाई शहर), पोलीस नाईक धनपाल लोखंडे (गेवराई), अशोक गवळी (धारूर), जीवन करवंदे ( अंबाजोगाई), गौतम सोनवणे (माजलगाव) या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशा वरून त्यांना केज येथून कार्यमुक्त करण्यात आले.

त्यानिमित्ताने दि. २९ मे रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सदर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामांचा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत आणि अधिकारी व नागरिक यांच्याशी असलेले स्नेहाचे संबंध याचा उल्लेख केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close