क्राइम

सहा मुलांना विहिरीत ढकलून आईचा आत्महत्येचा प्रयत्न……!

9 / 100

एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून देवून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यात घडली आहे. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. परंतु आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला मात्र बचावली आहे.

                महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले.पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले आणि त्यांनतर तिनेदेखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासीनी तीला पाहीले आणि विहिरीतुन बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तीन हकीकत सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला.

             दरम्यान, महिलेचा जीव वाचला असला, तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.महाड एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close