#Accident

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू……!

9 / 100

बीड दि.३१ – दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात दोन जण जागीच ठार झाले. सदरील घटना आज मंगळवारी ( दि. ३१ ) बीड-परळी रस्त्यावरील जरुड फाट्यावर घडली आहे.

सुभाष लक्ष्मण राठोड रा. वडवणी खोरी तांडा, नरेंद्र प्रभाकर जोशी रा. रामगड नगर बीड अशी मयताची नावे आहेत. नरेंद्र जोशी हे वडवणी येथे महावितरण मध्ये ऑपरेटर आहेत. सकाळी ते दुचाकीवरून वडवणी कडे जात होते तर, सुभाष राठोड हे वडवणी येथून बीडकडे येत होते. दरम्यान जरुड फाट्यावर दोघांच्या दुचाकींची‌ समोरासमोर जोरात धडक झाली. धडक होताच दोघेही रस्त्यावर फेकले गेले व दोघांनाही जबर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. एम.एच. २३ ए एम ८५३७ व‌ एम. एच. ४४ वाय ३५२७ असे अपघातग्रस्त दुचाकीचे नंबर आहेत.‌ अपघात घडताच घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने अर्धातास बीड-परळी मार्ग बंद होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close