गुरुवारी दुपारी कार आणि रिक्षा या वाहनांचा अपघात झाला आहे. यात कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडली असून रिक्षा चे दोन तुकडे झाले आहेत. तर रस्त्यावर एका लहान लेकरासह एक महिला पडलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले असून त्यापेक्षाही जास्त प्रमाणावर जिवीतहानी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नसून रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.