#Accident

‘त्या’अपघातातील मृतांची संख्या वाढली, जखमींपैकी चौघांचा मृत्यू……!

9 / 100

केज दि.३ – केज – अंबाजोगाई  रस्त्यावर चंदन सावरगाव ते होळ दरम्यान झालेल्या रिक्षा व इनोव्हा कारच्या अपघातातील मयतांचा आकडा वाढला असून आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने मयतांची संख्या आठ झाली आहे.

           केज अंबाजोगाई रोडवरील चंदन सावरगाव ते होळ दरम्यान दि २ जून रोजी सायंकाळी ५ वा च्या दरम्यान झालेल्या रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-५२२९) आणि इनोव्हा कार क्र (एम एच-१६/सी एन-७००)च्या भीषण अपघातात मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके (४८ वर्ष), प्रिया दीपकसिंग गोके (२ वर्ष), वीरसिंग दीपकसिंग गोके (१ वर्ष) आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (३५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
            दरम्यान इतर आठ जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचार सुरू असताना जखमी पैकी हरजितसिंग बादलसिंग टाक, दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, चंदाबाई बादलसिंग टाक, भारती कौर दिपकसिंग गोके या चौघांचा आज मृत्यू झाल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close