#Accident
केज बीड रोडवरील कदमवाडी फाट्याजवळ अपघात,अपघातातील चारचाकी वाहन फरार…..!
केज दि.६ – केज बीड रोडवरील टाकळी ते कदम वाडी फाट्या दरम्यान एका चारचाकी वाहनाने मोटारसायकल ला धडक दिल्याने पतिपत्नी गंभीर जखमी झाले असून चारचाकी वाहनाने अपघात झाल्यानंतर तिथून पळ काढला आहे.
तालुक्यातील दहिफळ येथील दिगंबर मोराळे व त्यांची पत्नी सोमवारी दि.६ रोजी दुपारी 1 च्या दरम्यान मोटारसायकल वरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात मोराळे पतिपत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्यानंतर त्या वाहनाने तिथून पळ काढला आहे. परंतु सदर चारचाकी वाहनाची नंबर प्लेट तिथे पडली असून त्यावरून वाहनाचा शोध लागेल. तर सदर अपघाताची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते रमाकांत मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना एका खाजगी वाहनातून दवाखान्यात पोहोच केले.