क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने केला पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त…..!
बीड दि.१२ – एएसपी पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच असून गुन्हेगार सैरभैर झाले आहेत.त्यातच आणखी एक मोठी कारवाई करत कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या मुक्या प्राण्यांची सुटका केली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 11 जून रोजी सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली की, जामखेड येथून आयशर टेम्पो क्रमांक MH 12 HD 0421 यामध्ये बेकायदेशीररित्या 18 जनावरे घेऊन जात आहेत. त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्यासाठी मांजरसुम्बा मार्गे मोमीनपुरा बीड येथे घेऊन जात आहेत. सदर माहिती मिळाल्यावरून कुमावत यांनी पथकातील पोलीस अंमलदार यांना दिल्याने पोलीस अंमलदार यांनी सदर चा आयशर टेम्पो क्रमांक MH 12HD 0421 दिनांक 11/06/ 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता मांजरसुंबा चौक हायवे पोलिस चौकीसमोर थांबून चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अरबाज शेख कट्टू, शहाबाज इजाज कुरेशी दोन्ही राहणार मोमीनपुरा बीड असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून कागदपत्रे विचारले असता व जनावराचे दाखले व जनावरे वाहतूक करण्याचा परवाना ही जवळ नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरची जनावरे बीड मोमीनपुरा येथील व्यापारी मोबीन कुरेशी यांची असून त्यांच्या सांगण्यावरून जामखेड येथून भरून मोमीनपुरा बीड येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनुर येथे घेऊन येऊन सदर टेम्पो तील जनावरे खाली उतरून मोजली असता दोन बैल व 11 गाई व पाच बारीक गोरे अशी एकूण 18 जनावरे ( 325 000 रुपयांचे) व टेम्पो किंमत 450000 रुपये असा एकूण 775000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
दरम्यान सविस्तर जप्ती पंचनामा करून ताब्यात घेऊन वरील तीन आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे नेकनुर येथे प्राण्यांचा छळ व प्राणी संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदकुमार ठाकूर पोलीस अधिक्षक बीड, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत केज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भांडणे, सचिन अहंकारे उपविभाग केज यांनी केली आहे.