महाराष्ट्र
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मोठी बातमी…..!
पुणे दि.१२ – टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचं सांगितलं आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, असं पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्यात.
दरम्यान, पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे. 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे.