क्राइम

विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच सुपारी देऊन पतीचा काढला काटा…..!

6 / 100
बीड दि.१३ – पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, चक्क एका महिलेने सुपारी देऊन पतीचा काटा काढलाय. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी अपघात झाल्याचं भासविलं. मात्र बीड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन या सिनेस्टाइल मर्डरचा उलगडा केलाय.मंचक गोविंद पवार 45 रा.वाला,ता. रेणापूर जि. लातूर, हमु, अंकुशनगर बीड असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
                11 जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता. यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचं भासविण्यात आलं होतं.तर यादरम्यान पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला 1 कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, 10 लाख रुपयांची दिली. त्यापैकी 2 लाख रुपये इसार म्हणून मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.
             दरम्यान याप्रकरणी आरोपी पत्नी गंगाबाई मंचक पवार 37, रा. वाला, ता. रेणापूर जि. लातूर , हमु . अंकुशनगर, बीड, श्रीकृष्ण सखाराम बागला 27, रा. काकडहिरा ता.बीड, सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे 47, रा . पारगाव सिरस ता.बीड व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील पत्नीसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार दोघांचा तपास सुरू आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close