ब्रेकिंग
केज तालुक्याचा निकाल 97.10 टक्के, तर 35 शाळांचा निकाल 100 टक्के…..!
केज दि.१७ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. तर केज तालुक्याचा एकूण निकाल 97.10 टक्के लागला असून तालुक्यातील सारणी (आ) येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.
तालुक्यातील सारणी (आ) येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयाचा निकाल 100% लागला असून 119 पैकी 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 113 विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर 6 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खरात तन्वी नाना 95.80, बनसोडे हर्षदा तुकाराम 95.40 तर सोनवणे आदित्य चंद्रकांत 95.20 हे विद्यार्थी गुणानुक्रमे पहिल्या तीन मध्ये आले आहेत. संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, मुख्याध्यापक पी.एच. लोमटे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान तालुक्यातील 81 शाळांपैकी 35 शाळांचा निकाल 100% लागला असून 4109 विद्यार्थ्यांपैकी 3990 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.