शहरातील उमरी रोडवरील सहयोग नगर भागात ज्ञानेश्वर परमेश्वर सोळंके यांचे घर आहे. परंतु रविवारी त्यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधून मध्यरात्री घराचे कुलूप तोडून घरात कपाटात ठेवलेले पन्नास हजार व सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला.
दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.