#Accident
अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार……!

केज दि.२१ – केज कळंब रोडवरील माऊली टॉकीज जवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागून एका हरणाचा जीव गेला आहे.
मंगळवारी दुपारी एक हरीण रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक लागली. त्यात हरणाला गंभीर दुखापत झाल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पत्रकार गौतम बचुटे ही सदर ठिकाणी पोहोचले आहेत. अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.