ब्रेकिंग
करुणा शर्मा यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी…..!
पुणे दि.२१ – करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. करुणा शर्मा यांच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटकही करण्यात आली. आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी रवानगी करण्यात आली आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा प्रकाशझोतात आल्या होत्या. आता जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शर्मांसह त्यांचा पीए म्हणून वावरणाऱ्या अजय देढे याला देखील काल पोलिसांनी अटक केली होती. याच अजय दाढेच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली. आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने याप्रकरणी करुणा शर्मांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पती अजय देढे आणि करुणा शर्मा यांनी पुणे येथील भोसरी परिसरात देढे याच्या पत्नीला बोलावले. त्यानंतर हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावले, यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली त्याचबरोबर पती अजय कुमार देढेने आपल्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक, शारीरिक त्रास दिला, असे 32 वर्षीय पीडितेने तक्रारीत म्हटले होते. येरवडा पोलिसांत पीडितेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा पती आणि करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
दरम्यान, जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्या प्रकरणी करुणा शर्मा यांच्यावर मागील वर्षी बीडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.