क्राइम

भरदिवसा रोड रॉबरी, साडेतीन लाखांची लूट…..!

1 / 100

बीड दि.२४ – येथील एका बँकेतून साडेतीन लाख रुपये काढून ते पिशवीत ठेऊन दुचाकीवर जाताना पाळत ठेऊन असलेल्या तीघांनी डोळ्यात मिर्ची पावडर टाकून जबर मारहाण करुन लुटू केली. सदरील घटना शुक्रवारी दुपारी खामगाव-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव ते पात्रुड दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासात करीत आहेत.

जनार्दन कोळसे व गजानन कोळसे रा. लोनगाव ( ता.माजलगाव ) हे दोघे भाऊ असून, त्यांचे कारखान्याला दिलेल्या ऊसाचे बील माजलगाव येथील पुर्णवादी बँकेच्या शाखेत जमा झाले. ती रक्कम घेऊन जाण्यासाठी ते दोघे माजलगाव येथे आले. बँकेतून सव्वा तीन अथवा साडेतीन लाखांची रक्कम काढली. रक्कम एका पिशवीत भरून दुचाकीवरुन परत आपल्या गावी लोनगावकडे चालले होते. मात्र ते माजलगाव व पात्रुडच्या मधील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कॅनल जवळ आले असता यांच्यावर पाळत ठेवून असलेले तिघे पाठी मागून दुचाकीवर आले. काही समजण्याच्या आधीच त्यांनी या दोघा भावांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून पिशवी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या ही अवस्थेत ते पिशवी सोडत नाहीत हे पाहून जबर मारहाण केली. लाखोंची रक्कम आसलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळ काढला.                             सदर प्रकरणी माजलगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भरदिवसा व मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर रोड रॉबरीची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close