क्राइम

अंगावर रॉकेल टाकून मारहाण, केज पोलीसांत गुन्हा दाखल……!

5 / 100
केज दि.२५ – तालुक्यात माहेरहून दोन लाख रु. घेऊन ये. म्हणून विवाहितेच्या अंगावर रॉकेल मारहाण केली म्हणून विवाहितेच्या तक्रारी वरून तिचा नवरा आणि सासूच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             मदीना कलीम पठाण वय ३० वर्षे रा. बानेगाव ता. केज जि. बीड ह. मु पिंपळगाव (कोथळा) ता. वाशी जि. उस्मानाबाद हिने दि. २४ जून रोजी केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा आणि सासू विरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दहा वर्षा पुर्वी तिचे लग्न बानेगाव ता. केज येथील कलीम रसुल पठाण याचेशी मुस्लीम रितीरीवाजा प्रमाणे झाले आहे. त्याच्या पासुन तिला समीर व शोएब ही दोन मुले झाली आहेत. तिचा नवरा कलीम पठाण हा मजुरी करुन कुटुंबाची उपजीवीका भागवीत आहे. लग्ना नंतर तिला सात वर्ष चांगले नांदवीले. त्या नंतर तिचा नवरा कलीम पठाण याला दारु पिण्याचे व्यसन लागले. दारुच्या व्यसनामुळे त्याच्यावर कर्ज झाल्याने तो त्याची बायको मदिना पठाण हिला कर्ज फेडण्यासाठी व घर बांधण्यासाठी तिच्या आई-वडीलां कडुन दोन लाख रुपये घेवुन ये. असे म्हणुन सतत मारहान करीत असे. त्याची बाजु घेवुन सासू मीना रसुल पठाण व नवरा कलीम रसुल पठाण हे दोघेजण घरातील किरकोळ कारणा वरुन व घर बांधण्यासाठी पैसे का आणत नाही; म्हणुन शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहान करुन शारीरीक व मानसीक छळ केला. म्हणुन मदिना हिने तिची आई आशा सीकंदर पठाण, मामा शेख नशीर अहेमद, आजी मनसब्बी अहेमद शेख यांना फोन करुन बोलावले. दि. २३ जून गुरुवार रोजी सायंकाळी ६:३० वा. सुमारास कलीम पठाण हा मदिना हिला म्हणाला की, तू तुझ्या नातेवाईकांना का बोलवले? म्हणुन शिवीगाळ करुन घरातील रॉकेल मदिनाच्या अंगावर टाकुन मारहान केली. या वेळी मुलगा समीर व शोएब यांना पण मारहान करुन मुक्कामार दिला.
        सदर प्रकरणी दि. २४ जून रोजी मदिना पठाण हिने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार तिचा नवरा कलीम पठाण व सासू मीना पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरघाट येथील दुरस्थ पोलीस चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close