महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करू – राजेंद्र गायकवाड

1 / 100
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. हा वाद आता न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीआंश आमदार आहेत. तसेच पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चर्चेत आलेले माजी वनमंत्री संजय राठोड हे ही शिंदे गटात सामिल आहेत. आता शिवसैनिकानींच पुजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे.
 पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ते त्यांच्या गटाला मिळून गुवाहाटीला गेले. त्यामुळे त्यांचे शिवसैनिक संतापले आहेत.
    यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेसोबत बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दर्शवल्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांनी पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील पुरावे समोर आणण्याची धमकीच राठोड यांना दिली आहे. याप्रकरणातील 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडून असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.
             दरम्यान, पुजा चव्हाण बंजारा समाजाच्या तरुणीला मारुन संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली. पुजावर त्याने कसे कसे अत्याचार केले हे आम्हाला माहित असून त्याचा पर्दापाश करु, असं गायकवाड यांनी जाहिर भाषणात सांगितलं. राठोड यांच्या विरोधात गळा काढणारे आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणारय़त असा सवालही गायकवाड यांनी केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close