ब्रेकिंग
मराठवाड्यातील ”या” दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर…..!
मुंबई दि.२९ – गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत होता. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. मात्र, अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे 3 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. औरंगाबादच्या नामांतराची चर्चा गेल्या 20 वर्षांपासून सुरू होती.
दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे 3 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक आहे अशी चर्चा होत असताना मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.