दुसऱ्याच दिवशी नव्या सरकार समोर पेच, शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव……!

मुंबई दि.१ – दहा दिवसांच्या राजकिय घडामोडीनंतर अखेर गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. परंतु अतिशय धक्कादायक सत्तांतरानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या सरकारच्या समोर एक वेगळाच पेच निर्माण झाला असून आता या नव्या सरकारच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
नव्या सरकारला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शनिवारी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना आता या नव्या सरकार समोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. कारण नव्या सरकार विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे.
शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी निलंबन नोटीस प्रकरणातील सुनावणी 11 जुलै ऎवजी आजच तातडीने घेण्याची मागणी केली आहे. या सोबतच त्यांनी निलंबनाची नोटीस बजावलेल्यांना बहुमत चाचणीत मतदानाची परवानगी देऊ नका. तसेच बहुमताची चाचणी पुढे ढकला अशी मागणी शिवसेनेने केली आहे.