राजकीय
शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल, राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांचे भाकीत…..!
राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा असेही सुचवले.