केज तालुक्यातील होळ आणि बनसारोळा या दोन महसूल मंडळात ९० मी मी एवढा पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे. मागील तीन दिवसां पासून केज तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून पिकांना पाणी लागल्याने पिके पिवळी पडण्याचा धोका आहे. नद्यांना अद्याप पूर आला नसला तरी पाणी पातळीत वाढ होत आहे. दोन दिवसा पासून परिसरात सुर्यदर्शनही झालेले नाही. अद्याप पर्यंत पडझड किंवा नुकसान झाल्याची माहिती नाही.