व्हायरल
केजडी नदीत माशांचा खच, बघ्यांची गर्दी….!

केज दि.१६ – तालुक्यातुन वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला असून नदी पात्रातील जिवंत मासे पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
तालुक्यांतील शेलगाव गांजी गावा लगत वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुला जवळ नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे वाहत आहेत. जणू काही माशांचा महापूर आल्यासारखे दिसत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तसेच मांसाहारी लोकांची देखील मासे पकडण्यासाठी गर्दी होत असून अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आणि त्यांचे विलोभनीय दृश्य म्हणजे जणू काही नदिला माशांचा पूर आल्या सारखे अत्यंत मनमोहक आणि मनाला मोहून जाणारे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.