#Vaccination
मोफत कोविड प्रिकॉशन डोसचा लाभ घ्या…..!

केज दि.१७ – “कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव” अंतर्गत सर्व शासकिय कोविड लसीकरण केंद्रावर प्रिकॉशन डोस मोफत येणार असून केज तालुक्यातील नागरिकांनीही याचा लाभ घेण्याचे आवाहन केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत यांनी केले आहे.
मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे सूचनेनुसार दिनांक १५ जुलै २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२२ (७५ दिवस ) य कालावधीमध्ये “कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव” अंतर्गत आपल्या आरोग्य संस्थेमध्ये १८ वर्षावरिल सर्व नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस मोफत देण्याचे आहे. सदर प्रिकॉशन डोस देण्यापुर्वी १८ वर्षावरिल नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोसच्या ६ महिने किंवा ३६ आठवडयाचा कालावधी पुर्ण केलेला असावा.
दरम्यान “कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवात ” जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.राऊत यांनी केले आहे.