देशविदेश
मंकीपॉक्स जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर……!

कोरोनोच्या संकटातून जग आताकुठे सावरत आहे. त्यातच आता मंकीपॉक्स नावाच्या एका संसर्गाने डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत अनेक देशात मंकीपॉक्स विषाणू पसरला आहे. 70 पेक्षा अधिक देशात मंकीपॉक्स एक जागतिक आपत्ती होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस ए.घेब्रेयसस यांनी मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी करताना त्यांना इमरजन्सी कमिटीतील इतर सदस्यांची सहमती मिळाली नाही. मात्र, तरीही टेड्रोस यांनी मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केले. इतर सदस्यांची सहमती नसताना असा निर्णय घेतल्याचे पहिल्यांदाच झाले आहे. टेड्रोस म्हणाले की, आपण खूप मोठ्या महामारीचा सामना करत आहोत. मंकीपॉक्सची आपल्याकडे खूप कमी माहिती आहे. मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण अमेरिकेत सापडला होता. त्यानंतर भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रूग्ण 14 जुलै रोजी केरळध्ये सापडला होता.
दरम्यान, यूेएइ मधूल भारतात आलेल्या व्यक्तिला मंकीपॉक्सची लागण झाली होती. 14 जुलैपासून आतापर्यंत भारतात मंकीपॉक्सचे 3 रूग्ण सापडले आहेत आणि तीनही रूग्ण केरळमध्येच सापडले आहेत. तर आता दिल्लीत देखील मंकीपॉक्सचा एक रूग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे.