मान्सून हा वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला असून केरळमध्ये वेळेआधीच दाखल झाल्याने राज्यात कधी पाऊस येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात पावसाच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांत पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.