क्राइम
केज तालुक्यात पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड, १५ जुगाऱ्यावर कारवाई……!
केज दि.२६ – तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील होळ येथे पोलिसांनी शेतात सुरू असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून पंधरा जुगाऱ्यावर कारवाई करीत २ लाख १७ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
केज तालुक्यातील होळ येथे बाळासाहेब नामदेव शिंदे यांच्या शेतातील गोठ्यात तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे याना एका गुप्त बातमीदारा कडून मिळाली. माहिती मिळताच दि. २५ जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि पोलीस उपनिरीक्षक औटी, पोलीस जमादार तुपारे, पोलीस कर्मचारी माने व खनपटे, महिला पोलीस समुद्रे यांच्या पथकाने होळ येथे पत्त्याच्या क्लबवर अचानक धाड टाकली. त्या वेळी सदर ठिकाणी गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या पंधरा जणां विरुद्ध कारवाई केली.तसेच त्यांच्याकडील नगदी १ लाख १० हजार रु. आणि १४ मोबाईल असे मिळून एकूण २ लाख १७ हजार ७६० रु.चा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिस जमादार सिताराम बळीराम डोंगरे यांच्या फिर्यादी वरून पंधरा जणांच्या विरुद्ध गु. र. नं. १०७/२०२२ जुगार प्रतिबंधक कायदा १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.