#Corona
चीनला पुन्हा कोरोनाची धास्ती, एक जिल्हा तर लॉकडाउन च्या मार्गावर…..!
मुंबई दि.२७ – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरवण्यास सुरूवात केलीयं. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. इतकेच नाही तर चीनच्या जियांगक्सिया या जिल्हात शटडाऊन करण्याची वेळ आलीयं. वुहान शहराबद्दल आपण या अगोदरही नक्कीच ऐकले असेल. संपूर्ण जगातील पहिला कोरोना रूग्ण हा याच वुहान शहरामध्ये आढळला होता. त्यानंतर या कोरोनाने जगात हाहा:कार माजवला. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुळे डबघाईला आली. कोरोनामुळे लोकांना घराच्या बाहेर निघणे देखील अवघड झाले. शाळा आणि महाविद्यालये कोरोनामुळे बंद असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. चीनच्या वुहानमध्ये परत एकदा कोरोनाचे रूग्ण सक्रिय झाल्याने अनेक देशांनी मोठा धसका घेतलायं. वुहानमधूनच संपूर्ण जगात कोरोना पसरला होता. कोरोनाच्या केस सापडत असल्याने तेथील बार, सिनेमा हॉल आणि कॅफे सर्व बंद करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. जियांगक्सियामध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ही महत्वाची पाऊल उचलण्यात आली आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जियांगक्सियाच्या शहरी भागात तीन दिवसांपासून तात्पुरते नियंत्रण उपाय लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या केसेस बघता बार, सिनेमा हॉल, बाजारपेठ, रेस्टॉरंट्स आणि इंटरनेट कॅफे पूर्णपणे बंद करण्यात आलेत.
जियांगक्सियामध्ये मोठ्या कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच काय तर पुढील काही दिवस आता जियांगक्सियामधील शाळा आणि महाविद्यालयेही बंदच राहणार आहेत. लोकांना खूप महत्वाचे काम असल्याशिवाय शहरही सोडून नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तेथील रहिवाशांना घरे सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. 2020 मध्ये चीनमधील वुहान येथे जगातील पहिले लॉकडाउन लावण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि संपूर्ण जगातच कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउन लावले.